प्रचाराच्या तोफा थंडावल्या उद्या मतदान जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक खासदार,आमदाराची प्रतिष्ठा पणाला -zp Election Live News

Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रचाराच्या तोफा थंडावल्या उद्या मतदान जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक खासदार,आमदाराची प्रतिष्ठा पणाला -zp Election Live News

प्रचाराच्या तोफा थंडावल्या उद्या मतदान जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक खासदार,आमदाराची प्रतिष्ठा पणाला -


धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे :  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या प्रचारासाठी गुरुवार दिनांक 5 रोजी जाहीर प्रचाराची सांगता झाली .मागील आठ दिवसापासून खासदार आमदारासह लोकप्रतिनिधी उमेदवार कार्यकर्त्यांचे पायाला भिंगरी बांधून तालुक्यात मतदार संघ ,गण, पिंजून काढला आहे. पदयात्रा रॅली जाहीर सभांनी गुरुवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या .या निवडणुकीत विविध पक्षाचे आजी-माजी खासदार आमदार लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला  लागली आहे.

 जिल्हा परिषदेच्या 55 गटासाठी 234 तर 8 पंचायत समितीच्या  110 गणासाठी 393 असे एकूण 627 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरून नशीब आजमावत आहेत .निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून सुरू असलेला जाहीर प्रचार आरोप प्रत्यारोपांच्या तोफा गुरुवार दिनांक 5 रोजी रात्री दहा वाजता थंडावली आहेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी दिनांक 7 रोजी मतदान होणार आहे .त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 6 रोजी मतदानाधिकारी कर्मचाऱ्यांनी पथके मतदान केंद्रावर रवाना झाली आहेत . तर मतमोजणी सोमवार दिनांक 9 रोजी आहे .निवडणुकीची घटीका अवघ्या काही तासावर येऊन ठेपल्याने छुपे राजकीय डावपेच सह,कट शह व फोडाफोडीचे राजकारण चांगलेच तापले आहे आहे .त्यामुळे आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे नागरिकाची लक्ष वेधले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण चांगले तापले जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री ,पालकमंत्रीसह काँग्रेस-राष्ट्रवादी  काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष, शिवसेनेचे आमदारांच्या तालुक्याचे ठिकठिकाणी सभा झाल्या एकमेकावर टिकेची झोड उडवली. आपापल्या भागात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्व पक्षांचे आजी माजी खासदार आमदार लोकप्रतिनिधींनी प्रचार यंत्रणा जोरदार राबवली आहे. त्यामुळे आता मतदार राजा कोणाला कौल देणार ?हे पहावे लागणार आहे



Post a Comment

0 Comments