लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांची आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय संयोजक पदावर नियुक्ती-Solapur Live Update Daily

Hot Posts

6/recent/ticker-posts

लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांची आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय संयोजक पदावर नियुक्ती-Solapur Live Update Daily

लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांची आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय  संयोजक पदावर नियुक्ती-Solapur Live Update Daily


सोलापूर-(संजय निंबाळकर): जळगाव  पाचोरा तालुक्यातील  वरिष्ठ पत्रकार  लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांची  दिल्ली , उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा,गुजरात, गोवा, दक्षिण  भारतात कार्यरत असलेल्या  देशव्यापी आयडियल पत्रकार संघटनेच्या नुकत्याच  झालेल्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय संपर्क प्रमुख पदावर कार्यरत असलेले लक्ष्मण आबा सूर्यवंशी यांची राष्ट्रीय संयोजक पदावर निवड करून त्यांना संघटनात्मक कार्यासाठी पदोन्नती  देण्यात आली आहे.

        त्यांची नियुक्ती संघटनेचे वरिष्ठ  पदाधिकारी राष्ट्रीय संरक्षक श्री .अरुण भारद्वाज, श्री .मकसूद अहमद आजमी, श्री. राकेश सिंह, कार्यवाहक राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजय वर्मा, आणि रवी दीक्षित, राष्ट्रीय महासचिव श्री. सूर्यकांत कदम, केंद्रीय संयुक्त सचिव श्रीमती जमुना चव्हाण, यांचेशी  सर्वानुमते  चर्चा करून राष्ट्रीय अध्यक्ष अजय कुमार मिश्रा यांच्या अनुमतीने करण्यात आली आहे.

लक्ष्मण आबा सूर्यवंशी हे पेंटिंग करणारे उत्कृष्ट आर्टिस्ट, खेळाडू असून  गेल्या  पंचवीस वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात जनहितार्थ, प्रबोधनात्मक  लिखाण आहेत. स्पष्टवक्ते, परखड, सडेतोड , निर्भीड, निष्पक्ष आणि सत्य परिस्थितीचे लिखाण त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असताना पत्रकारांच्या हिताच्या विविध  समस्या, मागण्या शासन, प्रशासन दरबारी मांडून पत्रकार हितांचे कार्य  करीत असून ते शासकीय मान्यता प्राप्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे परिवहन समिती चे जळगाव जिल्हा अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. 

त्यांच्या निवड बद्दल सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, शैक्षणिक वैद्यकीय  पाचोरा भडगाव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, पाचोरा नगर परिषद लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनीताताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत सचिव डॉ.अनिल देशमुख,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील सर, अखिल भारतीय मराठा  समाज  प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ योगेश पाटील, सचिव संजय पाटील, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष जिभाऊ पाटील यांच्या सह विविध स्तरावरील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------------

केंद्र व राज्य सरकार कडे पत्रकारांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार

   अनेक वर्षांपासून   शासकीय स्तरावर जेष्ठ, वयस्कर  अधिकृत  पत्रकारांना पेन्शन योजना, घरकुल, प्रवाशी सवलती,  मोफत आरोग्य, त्यांच्या मुलांना मोफत शैक्षणिक सवलती अशा अनेक समस्या  प्रलंबित आहेत. देश पातळीवर केंद्र व राज्य सरकार  कडे या पुढे पत्रकारांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी व त्यांच्या हितांसाठी  प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया आबा सूर्यवंशी यांनी दिली.


Post a Comment

0 Comments