/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> जमीन वाटणीचा वाद टोकाला; लहान भावाने मोठ्या भावाचा शेतात पाडला मुडदा - सोलापूर जिल्ह्यातील घटना -Solapur District Crime News

Hot Posts

जमीन वाटणीचा वाद टोकाला; लहान भावाने मोठ्या भावाचा शेतात पाडला मुडदा - सोलापूर जिल्ह्यातील घटना -Solapur District Crime News

जमीन वाटणीचा वाद टोकाला; लहान भावाने मोठ्या भावाचा शेतात पाडला मुडदा - सोलापूर जिल्ह्यातील घटना -


सोलापूर : जमीन वाटण्या व्यवस्थित न केल्याने धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लोखंडी घण घालून खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जाखले येथे शनिवार दिनांक 14 रोजी दुपारी घडली .याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नमूद भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हनुमंत रघुनाथ गायकवाड वय 68 राहणार जाखले तालुका माढा असे खून झालेल्या मयत भावाचे नाव आहे, उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड वय (58) असे संशयित  आरोपीचे नाव आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की हनुमंत ,नवनाथ , उत्तरेश्वर असे तिघे भाऊ होते या तिघा भावामध्ये गेली वीस वर्षांपासून जमिनीच्या वाटणीवरून वाद  होता; हा वाद कोर्टामध्ये निर्मित राहिला त्यामुळे जमिनीचा वाद वाढत चालला होता शनिवारी दिनांक 14 रोजी दुपारी मयताचा थोरला भाऊ हनुमंत यांनी खड्डा घेण्यासाठी जेसीबी बोलावले होते;परंतु खड्डा घेण्यास लहान भाऊ उत्तरेश्वर यांनी अडथळा केला जोपर्यंत वाटणी होत नाही. तोपर्यंत कोणी काही करायचे नाही असे तो म्हणत होता याच दरम्यान उत्तरेश्वर यांनी चिडून जाऊन थोरला भाऊ हनुमंत यांच्या डोक्यात लोखंडी धन घातला घन डोक्याला लागून दांड्यापासून निघुन पडला व दांडा हातात राहिला.

यावेळी दांड्याने तोंडावर मारहाण केली एवढ्यावर त्याचे समाधान झाले नाही तर शेजारी पडलेला दगड उचलून छातीवर घातला या जबर मारहाणीमुळे हनुमंत याचा जागीच मृत्यू झाला . या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये खबर मिळतात पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपीला अटक केली आहे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने भावाचा खून केल्याने गावात व परिसरामध्ये हळूहळू व्यक्त केली जात आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात वामन धोंडीबा पवार वय (70 )सेवानिवृत्त शिक्षक राहणार चौघे पिंपरी ता. माढा यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक केली आहे .या घटनेचा अधिक तपास हे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी हे करत आहेत

Post a Comment

0 Comments