ट्रक व कारचा भीषण अपघात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यूपूर्व; खरेदी केलेली कार घेऊन निघाले होते देवदर्शनाला -Track-Car Dash sangamnagar-shrirampur Road Accident

Hot Posts

6/recent/ticker-posts

ट्रक व कारचा भीषण अपघात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यूपूर्व; खरेदी केलेली कार घेऊन निघाले होते देवदर्शनाला -Track-Car Dash sangamnagar-shrirampur Road Accident

ट्रक व कारचा भीषण अपघात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यूपूर्व; खरेदी केलेली कार घेऊन निघाले होते देवदर्शनाला -Track-Car Dash sangamnagar-shrirampur Road Accident 


अहिल्यानगर : दोन दिवसांपूर्वी कार खरेदी केल्याने देवदर्शनासाठी निघालेल्या श्रीरामपूर येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन लहान मुले व एक महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत बाबळेश्वर श्रीरामपूर रस्त्यावर खंडाळ्याजवळ बुधवारी दिनांक 25 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या  सुमारास ही घटना घडली. खंडाळ्याजवळ एमआयडीसी मधून बाहेर पडलेल्या ट्रकला श्रीरामपुरातील चव्हाण कुटुंबीयांच्या कारची जोराची धडक बसली. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की काल बुधवार दिनांक 25 रोजी दुपारी चारच्या सुमारास श्रीरामपूर वरून संगमनेर रस्त्याने नाशिककडे देवदर्शनासाठी जात असताना संतोषी वडापाव चे संचालक व त्यांच्या कुटुंबातील मिळून सात सदस्य एमएच 3 ए एफ  00 54 या स्विफ्ट डिझायर गाडी मधून जात होते खंडाळा नजीक समोरून येणाऱ्या एचआर 67 3002 क्रमांकाच्या ट्रकला जोराची धडक बसली. या धडकेत शिफ्ट गाडी मधील चालक प्रशांत रमेश चव्हाण वय (24) ,संगीता अनिल चव्हाण वय (40) ऐश्वर्या अशोक चव्हाण वय (26) व सिद्धार्थ सुनील चव्हाण वय (15) हे चौघे घटनास्थळी जागीच ठार झाले. तर सारिका अनिल चव्हाण वय (30), रुद्र अशोक चव्हाण वय (६) व पृथ्वी अशोक चव्हाण वय (३) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्रवरा रुग्णालय येथे रात्री उपचार सुरू होते या घटनेची माहिती कळतात चव्हाण कुटुंबाचे नातेवाईक व मित्रपरिवार हे लोणी येथील रुग्णालयात दाखल झाले होते.

श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर खंडाळा येथील त्रिमूर्ती नर्सरी नजीक झालेला हा अपघात इतका भयानक होता की स्विफ्ट गाडी धडकेमुळे 15 ते फुट मागे सरकली गेली अपघातात कारची पुढील बाजू अर्ध्यापर्यंत आत घुसली होती व चालक त्यात अडकून जागीच ठार झाला होता. गाडीतील इतर सदस्य देखील गंभीर जखमी झाले होते अपघात घडल्यानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. जखमींना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ पोलिसांना प्रयत्नाची पराकाष्ट करावी लागली. हा अपघात कशामुळे व कसा झाला याबाबत सविस्तर माहिती मिळाली नसून समोरून येणारा ट्रक त्यांच्याविरुद्ध बाजूने असताना शिफ्ट कार विरुद्ध दिशेने अपघातग्रस्त अवस्थेत होती. घटनास्थळी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर ,श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ,हेड कॉलेज टेबल किशोर अवताडे यांच्या सहपरिवार विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी हजर होते .या भागात सुसाट वाहतूक असून योग्य त्या उपाययोजना करण्याची व वाहतूक नियंत्रित करण्याची मागणी प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे .हा अपघात झाल्यावर काही वेळात नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या अपघातात ग्रस्त झालेल्या चव्हाण कुटुंबाने चार ते पाच दिवसांपूर्वीच नवीन कार खरेदी केली होती व त्यातून ते देवदर्शनाला चालले होते असे प्राथमिक माहिती मिळाली आहे.

कार खरेदी केल्याचे आनंदात देवदर्शन

शहरातील सरस्वती कॉलनी येथे चव्हाण कुटुंबीय राहतात त्यांचे बस स्थानकासमोर वडापाव चे हॉटेल आहे चव्हाण कुटुंबीयांनी दोन दिवसापूर्वी  कार खरेदी केली होती. त्यामुळे कुटुंबीय हे देवदर्शनासाठी चालले होते अशी प्राथमिक माहिती आहे या अपघाताची भीषणता इतकी होती की कारचा चंदामेंदा झाला असून या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.



Post a Comment

0 Comments