वाघोली शिवारात आफुच्या झाडाची लागवड करणाऱ्या गुन्हा शेतकऱ्यावर दाखल-बारा लाखांचा मुद्देमाल जप्त -NDPS Act

Hot Posts

6/recent/ticker-posts

वाघोली शिवारात आफुच्या झाडाची लागवड करणाऱ्या गुन्हा शेतकऱ्यावर दाखल-बारा लाखांचा मुद्देमाल जप्त -NDPS Act

वाघोली शिवारात आफुच्या झाडाची लागवड करणाऱ्या गुन्हा    शेतकऱ्यावर  दाखल-बारा लाखांचा मुद्देमाल जप्त -NDPS Act


 धाराशिव (प्रतिनिधी)धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या आफु (अफू) लागवड करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. मोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वाघोली शिवारातील शेत गट नं. 149/1 मध्ये अजित जोतीराम सुरवसे (वय 36 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव) यांनी त्यांच्या शेतात अवैधरित्या आफुच्या झाडांची लागवड केली आहे.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट दिली. चौकशीदरम्यान संबंधित इसमाने शेतात आफुची लागवड केल्याची कबुली दिली. तपासणीअंती शेतातून एकूण 85 किलो 175 ग्रॅम वजनाचा अफू जप्त करण्यात आला. जप्त मालाची अंदाजे किंमत ₹12,77,625/- इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर मुद्देमालाचा सविस्तर पंचनामा करून तो जप्त करण्यात आला असून आरोपी अजित सुरवसे याच्याविरुद्ध NDPS Act कलम 8(ब), 18 अन्वये गुन्हा क्रमांक 43/2026 दाखल करण्यात आला आहे. दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हाके, पोलीस हवालदार भिमराव ढगे, पोलीस अंमलदार आरसेवाड, चालक पोलीस अंमलदार बनाळे तसेच महिला पोलीस अंमलदार जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अशा प्रकारची अवैध लागवड अथवा अमली पदार्थांबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.

Post a Comment

0 Comments