तुळजापूर बस स्थानकातील निकृष्ट कामावरून महाविकास आघाडीचे आगार प्रमुखाला स्मरण पत्र-Tuljapur St depo

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर बस स्थानकातील निकृष्ट कामावरून महाविकास आघाडीचे आगार प्रमुखाला स्मरण पत्र-Tuljapur St depo

तुळजापूर बस स्थानकातील निकृष्ट कामावरून महाविकास आघाडीचे आगार प्रमुखाला स्मरण पत्र-Tuljapur St depo

तुळजापूर (प्रतिनिधी) – तुळजापूर बस स्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविरोधात 3 जून 2025 रोजी आंदोलन करून दिलेल्या निवेदनास अद्याप उत्तर न मिळाल्याने महाविकास आघाडी, तुळजापूरच्या वतीने प्रमुख बस स्थानक तुळजापूर यांना स्मरणपत्र देण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून 2025 रोजी बस स्थानकातील निकृष्ट कामाबाबत आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी प्रशासनाने आठ दिवसांत लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतेही उत्तर प्राप्त झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या बस स्थानकाची भिंत कोसळल्याची घटना समोर आली. यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जनतेच्या कररूपाने जमा झालेल्या निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करत संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी स्मरणपत्रातून करण्यात आली आहे.

तसेच, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात करण्यात आलेल्या कारवाईची कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर नगरसेवक  अमोल माधवराव कुतवळ, रणजीत चंद्रकांत इंगळे, आनंद नानासाहेब जगताप आणि चिन्मय भालचंद्र मगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments