व्हाट्सअप स्टेटस वरून वाद साखरपुड्याच्या भर मंडपात रक्तरंजित थरार -तिघांची चाकुने भोसकुन हत्या धुळे जिल्ह्यातील घटना-Pimpalner Triple Murder
धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील नीलकंठ नगर परिसरात साखरपुड्याच्या कार्यक्रमात व्हाट्सअप स्टेटस च्या कारणावरून झालेल्या वादातून तीन जणांचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरुवार दिनांक 19 रोजी दुपारी घडली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतामध्ये देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय 35 राहणार साक्री व सुरेश गिरी सुपडू गोसावी वय 35 राहणार तिरंगा नगर साक्री यांचा जागीच मृत्यू झाला तर शैलेश सुरेश गोसावी व 29 यांचा धुळे येथे उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच पिंपळनेर व धुळे पोलिसांची टीम घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान या प्रकरणी चार जनाविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्न घरातील आनंद सोशनात रक्तरंजित शोकांतिकता ठरल्याची धक्कादाय घटना पिंपळनेर येथे घडली असून साखरपुड्याच्या मंडपात तिघांची निर्गुण हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे पूर्वीच्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला करून तिघांना ठार मारण्यात आले तर दोघेजण गंभीर जखमी झाली आहेत याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात सोनगड येथील चौघाजणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनगड येथील जुन्या वादाची पार्श्वभूमी
या संदर्भात पंकजगीर अशोगीर गोसावी वय (30) राहणार तिरंगा नगर साक्री (Sakri Taluka Crime) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सुमारे 9 महिन्यापूर्वी त्यांचे नातेवाईक विजय गोसावी रा. सोनगड राज्य गुजरात यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी पंकजगिरी गोसावी यांचे वडील अशोकगिरी सुपडूगीर गोसावी व त्यांचे मित्र राजेशगीर गोसावी हे सोनगड येथे गेले होते .त्यावेळी तेथे कांतीलाल उर्फ कन्हैया गोसावी जसवंतगिरी गोपालगिरी गोस्वामी व अनिल गोस्वामी यांनी तुम्ही पुढारपण करायला आले आहात गावात थांबायचे नाही असे म्हणत अपमानित करून जीवे मारण्याची धमकी देत हाकलून लावल्याचा आरोप आहे .यानंतर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी वाकोद जिल्हा जळगाव येथे बैठक बोलावली मात्र सोनगड येथील बैठकीस संबंधित व्यक्ती हे हजर राहिले नाहीत. दरम्यान दिनांक 18 रोजी अनिल गोस्वामी यांनी समाज माध्यमावर म्हणजेच व्हाट्सअप वर पोस्ट करून मारून टाकण्याची चितावणी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे
साखरपुड्यातून थेट रक्तरंजित हल्ला
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता येथील बिजासनी कॉलनीत राहणारे नातेवाईक विजय साहेबराव गोसावी यांच्या घरासमोरील मंडपात साखरपुडा व हळद व उद्याच्या लग्नकार्याचा कार्यक्रम सुरू होता. विजय मगनगिरी गोसावी यांच्या मुलीचा साखरपुडा सोनगड येथील रणवीर गोस्वामी यांच्याशी ठरला होता. या कार्यक्रमाला पंकजगिरी गोसावी त्यांचे वडील राहुल धर्मवीर गोसावी ,कुणाल धर्मगिरी गोसावी सागर मजगीर गोसावी (राहणार नंदुरबार )अंबादास गोसावी सुरेश सुपडी गिरी गोसावी ,देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (राहणार सुशील नगर साक्री) शैलेश सुरेश गोसावी वय 29 तसेच अन्य नातेवाईक उपस्थित होते अचानक तेथे कांतीलाल उर्फ कन्हैया गोस्वामी, जसवंतगिरी गोपालगिरी गोस्वामी व महेंद्र गोस्वामी आले तुम्ही येथेही पुढारपण करायला आलात का असे म्हणत त्यांनी शिवीगाळ सुरू केली समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर संतप्त होऊन त्यांनी धारदार चाकून हल्ला चढवण्यास सुरुवात केला.
चाकूचा सपासप वर आणि तिघांचा मृत्यू
यावेळी कन्हैया गोस्वामी यांनी सुरेश सुपडूगिरी गोसावी वय 55 (राहणार तिरंगा चौक साक्री) यांच्या पोटावर पाठीवर वार करून गंभीर जखमी गेले जसवंतगिरी गोपालगिरी गोस्वामी यांनी शैलेश सुरेश गोसावी यांचा पोटावर पाठीवर वार केले सोडवणूक करण्यासाठी आलेल्या देवेंद्र न्यानेश्वर पवार वय 35 यांनाही पोटावर पाटीवर वार करण्यात आले .पंकजगिरी गोसावी यांच्यावर ही छाती व पोटाच्या मधोमध वार करण्याचा प्रयत्न झाला त्यांनी हाताने अडवल्याने त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली .सागर मोजगीर गोसावी यांनाही दुखापत झाली आहे .महेंद्र गोस्वामी यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली गर्दी वाढताच आरोपी तिथून एका काळ्या रंगाच्या ब्रिजा जीजे 26 एई 36 66 वाहनातून पळून गेले.
डॉक्टरांनी तिघांना मयत घोषित केले
जखमींना तात्काळ पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात(Dhule Sakri Latest News) हलवण्यात आले त्यानंतर शैलेश गोसावी व सागर मजगिर गोसावी यांना पुढील उपचारासाठी धुळे हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले मात्र सुरेश सुपडीगिरी गोसावी व देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांना दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी डॉक्टरांनी मृत घोषित केले. धुळे येथे उपचार सुरू असताना शैलेश सुरेश गोसावी यांचाही मृत्यू झाला तर सागर मजगीर गोसावी ,पंकज गोसावी यांच्यावर उपचार सुरू आहेत
तिहेरी हत्याने महाराष्ट्र हादरला
लग्नाच्या मंडपात झालेल्या या तिहेरी हत्तेमुळे पिंपळनेर व साक्री परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .पूर्वीच्या वादातून व सोशल मीडियावरील( WhatsApp Status Murder Case) चितावणीमुळे हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा आरोप फिर्यादीतून करण्यात आला आहे. यावरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात कांतीलाल उर्फ कन्हैया गोस्वामी ,जसवंतगिरी गोपालगिरी गोस्वामी ,महेंद्र गोस्वामी व अनिल हट्टू गोस्वामी या चोघा जणा विरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न यासह गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस किरण बर्गे करत आहेत.
पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती समजताच पिंपळनेर व धुळे पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसर शील केला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे ,पोलीस उपाधीक्षक संजय कांबळे ,पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी घटनास्थळी भेट दिली असून घटनास्थळी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात तणाव पूर्ण शांतता असून पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच जखमेवर उपचारासाठी डॉक्टर राकेश मोहने ,डॉक्टर जितेश चौरे व त्यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने धाव घेतली .पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात जखमेवर उपचार सुरू करण्यात आली आहेत .या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरतात साक्री पिंपळनेर तसेच आसपासच्या गावातील समाज बांधवांनी रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.
संशयित आरोपी जेरबंद
या घटनेनंतर संशयित आरोपी गुजरातकडे ब्रिजा कारमधून पळून जात असल्याची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी मोठ्या शिताफितीने सापळा रचला गुजरात सीमेवरील ओठावरी घाट परिसरात स्थानिक नागरिकांना वाहन क्रमांक देऊन वाहतूक कोंडी निर्माण करण्यास सांगितले त्यामुळे आरोपींची गाडी अडवण्यात यश आले आणि तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
समाजमन सुन्न सर्वत्र शोककळा व हळहळ
या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण साक्री तालुका आणि धुळे जिल्हा हादरला असून गावागावात हळहळ व्यक्त केली जात आहे .आनंदोत्सवाचे रूपांतर शोकांतिकेत झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे .आनंद उत्सवासाठी उभारलेला मंडप क्षणात शोक मंदिरात बदलला तीन कुटुंबाचा आधार हिरावला गेला आणि लग्न घरातील शहनाईचा स्वर रक्तरंजित किंकाळ्यांनी कायमचा थांबला .एका क्षुल्लक वादाने तीन कुटुंबाची दिवे विजले आहे. पिंपळनेरकरांच्या मनात मात्र या रक्तरंजित घटनेची खोल जखम कायम राहणार आहे.


0 Comments