जमीन मोजणी होणार आता पंधरा दिवसात राज्यात 200 खाजगी भूमपकाची नियुक्ती-Land calculation Survey News
मुंबई : राज्यातील प्रलंबित शेत जमिनीच्या मोजणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला असून 200 खाजगी परवानाधारक भूमापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात ही माहिती दिली असून 30 मार्चपासून हे भूमापक प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतील यामुळे महिनाभराचे आत मोजणी प्रक्रिया पूर्ण होणे शक्य होणार आहे.
राज्यातील सर्वाधिक प्रलंबित मोजणी प्रकरणे असलेल्या 18 तालुक्यांमध्ये हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे .यामध्ये खाजगी भूमापक आणि शासकीय अधिकारी यांची संयुक्त टीम काम करेल जमिनीची नकाशे पंचनामे आणि अक्षांश रेखांश यासारखे तांत्रिक तपशील थेट प्रणालीवर अपलोड होतील ज्यामुळे पारदर्शकता येईल मात्र शासकीय जमिनीवरील अतिक्रमण एकत्रितकरण किंवा पुनर्जन्याचे काम खाजगी भूमापकांना करता येणार नाही.
अडीच एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मोजणी शुल्कात सवलत देण्याबाबत शासन सहानुभूतीपूर्वक विचार करत असून लवकरच याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी विधिमंडळात दिली आहे.

0 Comments