तुळजापुर: काटी येथे घरफोडी; 60 हजारांचा ऐवज लंपास, तामलवाडी परिसरात खळबळ-Tuljapur Crime News Update
धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील काटी येथे अज्ञात चोरट्याने पहाटेच्या सुमारास घरफोडी करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दशरथ अनंता मदणे (वय 32 वर्षे, रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 01 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे अंदाजे 4.30 वाजण्याच्या सुमारास तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून चोरट्याने रोख रक्कम 40 हजार रुपये तसेच अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी फिर्यादी दशरथ मदणे यांनी दि. 25 मार्च 2026 रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 331 (3), 305 (ए) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


0 Comments