तुळजापूर : सोन्याचे बिस्कीट” दाखवून वृद्ध महिलेची 90 हजारांची फसवणूक; तुळजापूरात धक्कादायक प्रकार

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : सोन्याचे बिस्कीट” दाखवून वृद्ध महिलेची 90 हजारांची फसवणूक; तुळजापूरात धक्कादायक प्रकार

तुळजापूर : सोन्याचे बिस्कीट” दाखवून वृद्ध महिलेची 90 हजारांची फसवणूक; तुळजापूरात धक्कादायक प्रकार-


तुळजापूर (प्रतिनिधी) : “सोन्याचे बिस्कीट सापडले” असा बनाव करून दोन अनोळखी इसमांनी 60 वर्षीय महिलेची तब्बल 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना तुळजापूर येथे घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पार्वती कृष्णकुमार राठोड (वय 60, रा. गोकुळ नगर, रोहिणी नगर 3, सैफुल, सोलापूर) या दि. 26 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील जुने बसस्थानक परिसरात जात होत्या. यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना गाठून “आम्हाला 10 तोळ्याचे दोन सोन्याचे बिस्कीट सापडले आहेत” असा विश्वास बसवला.

या इसमांनी त्यातील एक बिस्कीट पार्वती राठोड यांना दाखवून ते खरे असल्याचा भास निर्माण केला. तसेच लोभ निर्माण करत “हे बिस्कीट कमी किमतीत देतो” असे सांगत त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर त्या इसमांनी खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन पार्वती राठोड यांच्या गळ्यातील सुमारे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, अंदाजे 90,000 रुपये किंमतीचे, घेतले आणि तेथून पसार झाले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पार्वती राठोड यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

👉 नागरिकांसाठी आवाहन :
अशा प्रकारे “सोनं सापडलं”, “स्वस्तात देतो” अशा आमिषांना बळी पडू नये. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये व संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments