अणदुर येथुन मोटारसायकल लंपास ; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल- वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नळदुर्ग प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे मोटारसायकल चोरीची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मल्लिनाथ मारुती लांडगे (वय 59 वर्षे, रा. अणदूर ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांची अंदाजे 40 हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची मोटारसायकल (क्र. MH 25 AN 8121) ही दि. 25 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 4.00 या वेळेत अणदूर येथील जवाहर विद्यालय परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
आपली मोटारसायकल चोरीला गेल्याचे लक्षात येताच लांडगे यांनी तात्काळ शोध घेतला, मात्र वाहनाचा काहीच मागोवा लागला नाही. अखेर त्यांनी दि. 26 मार्च 2026 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 303 (2) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अणदूर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

0 Comments