तुळजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी विक्रमसिंह देशमुख तर उपसभापती रोहिणीताई मेलगीरी यांची निवड आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार
तुळजापूर : तुळजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे श्री. विक्रमसिंह देशमुख (काटी) यांची तसेच उपसभापतीपदी सौ. रोहिणीताई विवेकानंद मेलगीरी (सिंदगाव) यांची निवड झाल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलताना सांगितले की, विक्रमसिंह देशमुख आणि रोहिणीताई मेलगीरी यांच्या नेतृत्वगुणांमुळे, कार्यतत्परतेमुळे तसेच जनतेप्रती असलेल्या दृढ बांधिलकीमुळे तुळजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविणे, विकासकामांना गती देणे आणि तालुक्यातील सर्व घटकांचा समतोल विकास साधणे यासाठी दोघेही प्रभावी व लोकाभिमुख कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देताना, त्यांच्या नेतृत्वामुळे तुळजापूर तालुक्याची प्रगती अधिक वेगाने होईल आणि विविध विकासकामांना चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री. सुनील चव्हाण, श्री. नितीन काळे, श्री. विनोद गंगणे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments