दुर्दैवी घटना :गहु काढणीच्या मळणी यंत्रात अडकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ;जालना जिल्ह्यातील घटना-Jalna Farmers Accident News
जालना प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील रामगव्हाण येथे गुरुवार दिनांक 5 रोजी एक दुर्दैवी घटना घडली. गहू काढण्याच्या मळणी यंत्रात अडकून एका तरुण शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे त्याच दिवशी वृद्धापकाळाने चुलत्याचाही मृत्यू झाल्याने गावात शुभकाळा पसरली आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की घनसांगवी तालुक्यातील रामगव्हाण येथील शेतकरी हरिभाऊ सुधाकर इंगोले वय 29 दिनांक 5 रोजी दुपारी शेतातील काम करत असताना अपघाती मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार हरिभाऊ इंगोले हे विठ्ठल नगर वस्ती येथील शेतात गहू काढण्यासाठी मळणी यंत्र व ट्रॅक्टर घेऊन गेले होते गहू काढणीचे काम सुरू असताना अचानक ते अनावधानाने चालू असलेल्या मळणी यंत्राच्या यंत्रात खेचले गेले त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र यंत्राच्या वेगामुळे ते त्यातच अडकले. घटनेची माहिती मिळतात उपस्थित त्यांनी तात्काळ मळणी यंत्र बंद केले परंतु तोपर्यंत या भीषण अपघातात हरिभाऊ इंगोले यांच्या कमरेपासून वरच्या भागाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला .या घटनेची माहिती घनसांगी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल रणजीत वैराळ व कॉनिस्टेबल संतोष एस लोटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला .यानंतर हरिभाऊ इंगोले यांना उपजिल्हा रुग्णालय घनसांगवी येथे हलवण्यात आले याप्रकरणी घनसांगवी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान हरीभाऊ इंगोले हे शेतकरी चळवळीशी निगडित व मेहनती तरुण शेतकरी म्हणून परिसरात परिसत होते. त्यांच्या अकाली निधनाने रामगव्हाण व परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे त्याच दिवशी त्यांच्या चुलते वसंतराव इंगोले यांचे निधन झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

0 Comments