मौजे इटकळ मध्ये राजस्व अभियानाचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
समाधान शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
""""""""""""""""""""""""""""""""''""""""""
मंजुरी पत्राचे जिल्हाधकाऱ्यांच्या हस्ते वाटप.
"""""""""''"'""""""""""""""""""""""""""""""
महाराजस्व समाधान शिबिरात संजय गांधी निराधार ,श्रावण बाळ,इंदिरा गांधी निराधार योजनेच्या वयोवृध्द लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे) :- तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभगामार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान समाधान शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.या अभियानाचे उदघाटन तहसीलदार अरविंद बोळंगे,तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा अधिकारी कीर्तीकुमार पूजार,गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे,काटगाव जिल्हा परिषद गट सदस्य निवृत्ती माळी,शहापूर गट जिल्हा परिषद सदस्य सुनिल बनसोडे, पंचायत समिती सदस्य भाग्यश्री शिंदे, प्रियांका मिटकरी, सुलभा कोळी ,नायब तहसीलदार प्रियंका काळे लोखंडे,मंडळ अधिकारी डी.पी.गायकवाड तलाठी गोरख तोडकरी, पोलीस पाटील विनोद सलगरे यासह विविध गावचे सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या मार्गदर्शानाखाली शिबिरात 7/12 दुरुस्ती,फेरफार निर्गमित करणे,उत्पन्न दाखला,रहिवासी दाखले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी आवश्यक दाखल्यांचे अर्ज स्वीकृती,निराधार योजना, पीएम - किसान योजना, सातबारा मधील त्रुटी विषयी अर्ज स्विकारण्यात आले.कुटुंबातील रक्त नात्यातील व्यक्तीच्या नावाच्या शेतीचे वाटणी पत्र आता सुलभ झाले असून,केवळ पाच रुपयांचे तिकीट लावून तलाठ्यामार्फत अर्ज केल्यास कुटुंबातील व्यक्तींच्या नावे करता येणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी केले.या शिवाय पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग,ग्रामविकास विभाग तसेच आरोग्य विभाग आदी 17 शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी शिबिरात उपस्थित राहून नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देत विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

0 Comments