धाराशिवला मिळाले कर्तृत्ववान नेतृत्व; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर प्रियंवदा महाडदळकर यांचे नियुक्ती-Dharashiv CEO
धाराशिव/ प्रतिनिधी:- धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि उत्साहवर्धक बातमी समोर आली आहे. कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेल्या श्रीमती प्रियंवदा महाडदळकर यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा प्रशासनाला सक्षम नेतृत्वाची साथ मिळाली असून विकासकामांना नवी गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सन 2022 मध्ये झालेल्या UPSC Civil Services Examination मध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत आणि देशात 13 वा क्रमांक पटकावत त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले होते. त्यांच्या या घवघवीत यशामुळे त्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
प्रशासकीय सेवेत काम करताना त्यांनी नेहमीच पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लोकाभिमुख दृष्टीकोनाला प्राधान्य दिले आहे. अचूक निर्णयक्षमता, धाडसी भूमिका आणि जनहिताच्या कामांबाबत असलेली कटिबद्धता यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. विविध पदांवर काम करताना त्यांनी प्रशासनातील शिस्त आणि परिणामकारकता यावर भर दिला आहे. तर मागील मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांची सांगली जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे, ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे स्थानिक नागरिक, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकाळात धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर मागील शिव महिना घोष यांची सांगली जिल्हा अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.

0 Comments