चिवरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीची निवड; जेम्स उर्फ बाळु चिमणे अध्यक्षपदी तर सालम चिमणे यांची उपाध्यक्षपदी निवड -Dr Babasaheb Ambedkar Jayanti Commite

Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी/प्रतिनिधी बिभीषण मिटकरी:  तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे Dr. Babasaheb Ambedkar जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जयंती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते जेम्स उर्फ बाळु चिमणे यांची अध्यक्षपदी तर सालम चिमणे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेला गावातील बौद्ध समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समितीची निवड एकमताने झाल्यामुळे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

या बैठकीस मोतीराम चिमणे, सुभाष चिमणे ,राम वाघमारे,कैलास गायकवाड, धनराज मिटकरी,  उद्धव चिमणे, प्रेम मिटकरी, दीपक बनसोडे, कांचन चिमणे, शरद निकाळजे, समाधान चिमणे, जीवन बनसोडे, अजय मिसाळ तसेच सर्व बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत आणि सहमतीने ही निवड पार पडली.

यावेळी आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सामाजिक एकता, बंधुता आणि विचारांचा प्रसार यावर भर देत यंदाचा जयंती सोहळा अधिक भव्य करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments