🔴 तुळजापूर : मुलाच्या प्रेम संबंधाच्या संशयातून वडील-भावाला टोळक्याकडून जीवघेणा हल्ला ;१२ जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल-Tuljapur Crime News Update
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील बोरी येथील एकाच कुटुंबातील 12 जणांच्या टोळक्याने मुलाच्या प्रेमसंबंधाच्या संशयातून एका व्यक्ती व त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील एनएच-52 महामार्गालगत उड्डाणपुलाजवळील टायर दुकानासमोर ही घटना घडली. फिर्यादी शिवाजी शहाजी हावळे (वय 50, रा. बोरी) व त्यांचे भाऊ भिवाजी हावळे यांच्यावर आरोपींनी हल्ला केला.
आरोपींमध्ये नागेश नारायण जानराव, पृथ्वीराज हंसराज जानराव, देवानंद विठ्ठल जानराव, धैर्यशिल सिद्धार्थ जानराव, इंद्रजित सिद्धार्थ जानराव, अजय किसन जानराव, आनंद चिगुबा जानराव, प्रणव हंसराज जानराव, नागेश सुधाकर जानराव, सोमधुत उमाची जानराव, इंद्रजीत विशाल पांडागळे आणि प्रतिक बालाजी राऊत (सर्व रा. बोरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचा समावेश आहे.
फिर्यादीच्या मुलगा संग्राम याचे कोणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपींनी एकत्र येत गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यानंतर शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी तसेच कत्ती, लोखंडी रॉड, टॉमी, काठी व दगडांच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शिवाजी हावळे व त्यांच्या भावाला गंभीर दुखापत झाली आहे.
यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या मुलगा संग्राम यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमी अवस्थेत उपचार घेत असताना फिर्यादीने दि. 23 मार्च 2026 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 115(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 352, 351(3) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

0 Comments