चोरीच्या संशयावरून बापाने पोटच्या दोन मुलींना उलटे टांगले; एकीने पाणी पाणी म्हणत जीव सोडला; जखमी मुलीने केला भांडाफोड ;सांगली जिल्ह्यातील संतापजनक घटना-Sangali Crime News Update

Hot Posts

6/recent/ticker-posts

चोरीच्या संशयावरून बापाने पोटच्या दोन मुलींना उलटे टांगले; एकीने पाणी पाणी म्हणत जीव सोडला; जखमी मुलीने केला भांडाफोड ;सांगली जिल्ह्यातील संतापजनक घटना-Sangali Crime News Update

चोरीच्या संशयावरून बापाने पोटच्या  दोन मुलींना उलटे टांगले; एकीने पाणी पाणी म्हणत जीव सोडला; जखमी मुलीने केला भांडाफोड ;सांगली जिल्ह्यातील संतापजनक घटना-Sangali Crime News Update 


सांगली: चुलत्याच्या घरात किरकोळ चोरी केल्याच्या संशयावरून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावामध्ये एका बापाने पोटच्या  दोन मुलींचे बुधवारी रात्री हातपाय बांधून त्यांना रात्रभर घराच्या तुळईला उलटे टाकून ठेवण्याचा निर्दयी प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष छळात सानिका यमगर वय (10) या चिमुकलीचा मृत्यू झाला तर दुसरी मुलगी अनुजा वय (11) ही मृत्यूची झुंज देत असून तिने दिलेल्या जबाबा वरून  हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी मुलीचे वडील नाना  यमगर वय (38) याला चौकशीसाठी ताब्यात घेतली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावामध्ये नाना यमगर याला चार मुली ,एक मुलगा आहे दोन मुलींनी चुलत्याच्या घरात चोरी केल्याचा संशय संशयित नाना यमगर यास दोन दिवसांपूर्वी आला या संदर्भात त्याने मुलीकडे चौकशी केली मात्र त्या कबूल झाल्या नाहीत .या रागातून नराधम बापाने सानिका व अनुजा या दोघींचे हातपाय बांधले आणि त्यांना घरातील छताच्या तुळईला रात्रभर अडकवून ठेवले. धकादायक म्हणजे मुलीला वर टांगलेले असताना आरोपी बाप आणि आई त्याच खोलीत खाली झोपली होती रात्रभर या दोन्ही मुलीचे डोके खाली आणि पाय वर अशा अवस्थेत होत्या .बुधवार दिनांक 25 मार्च रोजी सायंकाळी पाच पासून ते 26 मार्च सकाळी सहा वाजेपर्यंत त्या निष्पाप दोन्ही मुली रात्रभर तुळईला टांगुनच होत्य.

दरम्यान सानिकांनी व अनुजाने आपल्या सोडवण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी बापाकडे विनवणी केली मात्र पाषाण हृदयी बापाने त्यांना पाण्याचा थेंबेही दिला नाही .रात्री मुलींचे आजोबांनी त्यांना सोडवण्याचा आणि पाणी देण्याचा आग्रह केला तरीही बापाला पाझर फुटला नाही ;उलट त्यांनी स्वतःच्या वडिलांना कोयत्याने मारहाण केली दरम्यान गुरुवारी सकाळी दोन्ही मुली बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून त्यांना खाली उतरवण्यात आले तोपर्यंत दहा वर्षाच्या सानिकाचा मृत्यू झाला होता. अनुजाही बेशुद्ध असल्याने तिला तातडीने आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गावात मृत सानिकावर अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच रुग्णालयात शुद्धीवर आलेले अनुजाने घडलेल्या प्रकार डॉक्टरांना सांगीतला तर या भयानक घटनेचा उलगडा झाला नराधम बाप नाना यमगर  याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

गुपचूप अंत्यसंस्कार ......चौकशीची गरज

केवळ अनुजा योगायोगाने वाचली आणि झाला प्रकार ती डॉक्टरांना सांगू शकल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला सानिकाच्या मृत्यूच्या घटनेत अंत्यसंस्काराची तयारी होणे ही बाब भयंकर आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे.

नराधम बाप घटनेची पुनरावृत्ती

माणुसकीला काळीमा फासणारी अशीच घटना मागील वर्षी नेलकरंजी येथील शिक्षक बापाकडून घडली होती यात साधना धोंडीराम भोसले या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा बळी गेला कौटुंबिक अत्याचाराची आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावातील दुसरी घटना चर्चेत आहे.

Post a Comment

0 Comments