ब्रेकिंग न्यूज: कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू; घायवळ गँगवर खुनाचा गुन्हा वाढणार
पुणे / अहिल्यानगर प्रतिनिधी :
पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याचा अखेर मृत्यू झाला. 13 दिवसांपूर्वी जामखेड येथे झालेल्या भीषण गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर तो मृत्यूशी झुंज देत होता. अखेर आज त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

🔫 जवळून गोळीबार; शरीरात चार गोळ्या राहिल्या
सागर मोहोळकर याच्यावर 4 तारखेला जामखेड शहरात अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्याच्या शरीरात एकूण सहा गोळ्या लागल्या. त्यापैकी दोन गोळ्या डॉक्टरांनी काढल्या होत्या, मात्र उर्वरित चार गोळ्या शरीरातच राहिल्या. त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते.
गोळ्यांमुळे त्याचा रक्तदाब सतत अस्थिर होत होता. अखेर आज प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला.

🏥 जामखेड ते पुणे ससूनपर्यंत उपचार
गोळीबारानंतर सुरुवातीला त्याला जामखेड, नंतर अहिल्यानगर आणि पुढे पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 13 दिवसांपासून डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते.

⚠️ घायवळ गँगचा संशय; चौघांवर गुन्हा
या हल्ल्यामागे पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या टोळीचा हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यातील एक आरोपी जामखेडमधून अटक करण्यात आला असून, त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपी कोथरूड परिसरातील असून ते फरार आहेत.

⚖️ आता ‘खुनाचा गुन्हा’ वाढणार
मोहोळकरच्या मृत्यूनंतर या प्रकरणात आता ‘खुनाचा गुन्हा’ (IPC 302) वाढवला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिली आहे.

⚡ जुना वाद ठरला कारण
गेल्या वर्षी 11 एप्रिल 2025 रोजी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंदरूड गावच्या यात्रेत सागर मोहोळकर याने नीलेश घायवळ याच्या कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते.
नंतर मोहोळकरने माफी मागितली असली तरी, हा अपमान घायवळ गँगने मनात ठेवूनच सूड उगवला असल्याची चर्चा आहे.

💪 ‘राक्षसी ताकद’ चर्चेत
हल्ल्यानंतर मोहोळकरच्या ताकदीच्या कथा चर्चेत आल्या होत्या. तोंडात गोळी लागूनही ती स्वतः काढण्याचा प्रयत्न, तसेच त्याला ताब्यात घेण्यासाठी अनेक पोलिसांची आवश्यकता भासणे, अशा अनेक घटना समोर आल्या होत्या.

🚨 गुन्हेगारी पार्श्वभूमी
सागर मोहोळकर हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल होते. विशेष म्हणजे, तो एका खुनाच्या प्रकरणात तुरुंगात असतानाच आणखी एक खून केल्याचा आरोप आहे.
नाशिक कारागृहातून तो महिन्याभरापूर्वीच बाहेर आला होता. त्यानंतरच त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला.

🔍 पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलिसांकडून सुरू असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

0 Comments