🚨 मोठी बातमी : जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात - सावंत बालंबाल बचावले, भाजप प्रवेशावरून परतताना घडली घटना-Dhanjay sawant Car Assident News

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारचा सोलापूर–पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. मात्र सुदैवाने या भीषण धडकेत सावंत हे बालंबाल बचावले असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. ही घटना गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास बारामतीजवळ घडली.

🔴 अपघाताची थरारक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय सावंत हे बुधवारी मुंबई येथे भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटोपून आपल्या टोयोटा फॉर्च्युनर (MH 12 SE 5559) गाडीतून परंड्याकडे परतत होते.
भिगवणजवळील डाळज २ गावाच्या हद्दीत येताच समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने (MH 12 WJ 6374) त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

💥 कारचा चक्काचूर, पण सावंत सुरक्षित

धडक इतकी जबरदस्त होती की फॉर्च्युनरच्या चालकाच्या बाजूचा संपूर्ण भाग चक्काचूर झाला. आलिशान गाडीचे मोठे नुकसान झाले असून अपघाताचे दृश्य अतिशय भीषण होते.

तथापि, या गंभीर अपघातातून धनंजय सावंत हे सुखरूप बचावले. चालक आणि सुरक्षारक्षक यांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

🗣️ सावंत यांची प्रतिक्रिया

“कार्यकर्त्यांचे प्रेम, शुभेच्छा आणि ईश्वराच्या कृपेने मी या भीषण अपघातातून सुखरूप बाहेर आलो. प्रकृती स्थिर आहे, कुणीही काळजी करू नये,” अशी प्रतिक्रिया धनंजय सावंत यांनी दिली.

📍 राजकीय पार्श्वभूमी

विशेष म्हणजे, धनंजय सावंत यांनी नुकताच मुंबईत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटोपून परत येताना हा अपघात घडल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.अपघात गंभीर असला तरी मोठी जीवितहानी टळली, हेच सर्वांसाठी दिलासादायक आहे.

Post a Comment

0 Comments