अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; या तारखेपर्यंत करता येणार ऑनलाइन नोंदणी-Aganiveer Bharati Application Regestration
धाराशिव : अग्निपथ योजनेअंतर्गत अग्नी वीर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील इच्छुक अविवाहित उमेदवारांनी लवकरात लवकर नोंदणी करावी अशी आव्हान जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धाराशिव यांनी केली आहे. अग्नीवर भरतीसाठी दिनांक 1 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी जिल्ह्यातील पात्र व इच्छुक तरुणांनी ही संधी साधून अग्निपथ योजनेत सहभागी व्हावे असेही आव्हान करण्यात आले आहेत या भरती प्रक्रिया अंतर्गत संभाव्य परीक्षा जून 2026 मध्ये होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

0 Comments