काक्रंबा (ता. तुळजापूर) येथे क्रिकेट प्रीमियर स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ-Tuljapur Live Update Balaghatnewstimes

Hot Posts

6/recent/ticker-posts

काक्रंबा (ता. तुळजापूर) येथे क्रिकेट प्रीमियर स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ-Tuljapur Live Update Balaghatnewstimes

काक्रंबा (ता. तुळजापूर) येथे क्रिकेट प्रीमियर स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ-Tuljapur Live Update Balaghatnewstimes 

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट प्रीमियर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उद्घाटन मधुकर शेळके (नगरसेवक, तुळजापूर नगर परिषद) यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रीमियर स्पर्धेत तुळजाई ११, आरव ११, श्री गणेशा ११, महाकाल ११ आणि भिसे ब्रदर्स ११ या संघांचा सहभाग असून, तालुक्यातील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. उद्घाटनानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या सामन्याला सुरुवात करण्यात आली.

यावेळी लोकमंगलचे संचालक सचिन आरगडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे, पत्रकार संजय गायकवाड, युवा नेते अशोकराव देवगुंडे, उमेश खांडेकर, चेतन बंडगर, गणपत पाटील, अमर झाडे, मेहराज शेख, प्रसाद मोरे, बबन घोगरे, पवन वाघमारे, गोविंद साठे, राजकुमार भिसे, सौरव भिसे, समाधान देवगुंडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सर्व क्रिकेट संघांचे खेळाडू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा एक पर्वणी ठरत असून, आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन करून स्पर्धा सुरळीत पार पाडण्याची तयारी केली आहे.

Post a Comment

0 Comments