जळगाव - क्रुझर चे चाक निखळल्याने नववधूसह तिघांचा भीषण अपघातात मृत्यू 6 जण गंभीर जखमी-Jalgaov Breaking News

Hot Posts

6/recent/ticker-posts

जळगाव - क्रुझर चे चाक निखळल्याने नववधूसह तिघांचा भीषण अपघातात मृत्यू 6 जण गंभीर जखमी-Jalgaov Breaking News

जळगाव - क्रुझर चे चाक निखळल्याने नववधूसह तिघांचा भीषण अपघातात मृत्यू 6 जण गंभीर जखमी-Jalgaov Breaking News 


जळगाव : वापी गुजरात येथून अकोल्याकडे जाणाऱ्या क्रूजर गाडीचे चाक निखळल्याने गाडी उलटली या अपघातात घटनेत नववधूसह तिघांचा जागेचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना धरणगाव तालुक्यातील वऱ्हाड गावाजवळ बुधवारी दिनांक 29 रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली या अपघातात नववधु पूजा रवी वागडकर, दत्तू तुळशीराम भागवत वय (42) आणि जगदीश चंद्रभान वागडकर  या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला एका क्षणात लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले असून वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की अकोला येथील रहिवासी पूजा रवी वागडकर वय  (22) यांचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे संपन्न झाला होता लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकांसह माहेरी अकोल्यात परतत होती संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते बुधवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी ही क्रूजर गाडी धरणगाव तालुक्यातील वऱ्हाड गावाजवळून जात असताना अचानक गाडीचे एक चाक निखळले वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीचा भीषण अपघात झाला एका क्षणात लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोक सागरात झाली असून वागडकर  कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला  आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात सहा जण गंभीर जखमी

या भीषण अपघात गाडीतील अन्य सहा प्रवासी गंभीर जखमी झाली आहेत जखमेमध्ये प्रेम भारत वागडकर   वय (24) नितेश सुरेश काठोळे वय (35) अमोल दामोदर गीतेवर (35) रवी प्रभाकर वागडकर वय (32) तुळशीराम भीमराव भागवत वय (67) आणि 14 वर्षीय बालक अंश नितेश काठोळे हे जखमी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments