तुळजापूरात अनोळखी 45 वर्षीय पुरुषाचा संशयास्पद मृत्यू; ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन-Tuljapur Police Station
तुळजापूर (प्रतिनिधी):
तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (आ.मृ.) क्रमांक 44/2026, कलम 194 भा.ना.सु. अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. संबंधित व्यक्तीने अंगात हिरव्या रंगाच्या पट्ट्यांचा पांढरा शर्ट व अंडरवेअर परिधान केलेले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या अनोळखी मृत व्यक्तीचा तपास सुरू असून, तो कोणत्या गावचा आहे किंवा हरवलेला आहे का, याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास त्यांनी तुळजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा 9607998715 या मोबाईल क्रमांकावर माहिती कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, हरवलेल्या नातेवाईकांबाबत किंवा संशयास्पद माहिती असल्यास त्वरित कळवून तपासात मदत करावी.

0 Comments