● अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती च्या वतीने राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातृसन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
धाराशिव/ प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती च्या वतीने विविध क्षेत्रांत कार्य करणा-या स्त्री व पुरुष यांच्यासह त्यांच्या मातृ शक्तीं चा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ११ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक कांचन रिसोर्ट, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नवसारी अमरावती,येथे आयोजित करण्यात आले होते.
महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याला विशेष उपस्थिती आमदार अमरावती विधानसभा सौ. सुलभाताई खोडके यांचेसह, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डाॅ. शंकर अंदाणी उद्घाटक म्हणून संजीवनी काळे, साहित्यिक ,वनिता इंगळे, दिव्यांगाची आई,श्रीमती शोभाताई कंकाळे, दिलीप हरिभाऊ काळे, अमरावती विद्यापीठाचे अध्यासन केंद्र प्रमुख, कांचन हरिदासपंत उल्हे, संचालिका कांचन रिसोर्ट, वैभव निमकर,जगविख्यात व्याख्याते समाजसेविका अनुष्का बेलोरकर, डाॅ सारीका गायकी, प्रतिभाताई खापरे, ग्रामगिताचार्य गौतम मोरे सत्याग्रह फोरम प्रदेश संघटक, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरस्कारार्थी व त्यांच्या आईंचा सुध्दा सन्मान करण्यात आला. या पुरस्कार वितरणावेळी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला;धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी येथील श्री गणेश नावडे यांना व मातोश्री राहीबाई वसंत नावडे यांना राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातृसंमान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कु परिणीती मांडळे हिने गणेश वंदना, शिव तांडव नृत्याचे सादरीकरण केले. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा व आरतीची प्रस्तुती कु वैदेही, वैशाली, निलेश सुरोशे, कु अक्षरा, संगिता ओमनाथ भोयटे, यांनी केली, पारंपारीक भारूडाचे सादरीकरण विदर्भाची भारूडमती अनिता अडकीने केले. तसेच माॅ जिजाऊ वंदना सादर करण्यात आली,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी सचिन चव्हाण यांनी केले, कार्यक्रमाला संदीप वानखडे सर, विदर्भ प्रकाश वृत्तपत्र संपादक प्रविण डाके सर, सावित्रीबाई फुले शाळा शिक्षिका विद्या माहोरे, गजानन मुदृगल, निलेश टवलारे, अशोक तायडे, नजमा काझी, स्नेहा राऊत, अनुज म्हस्के, नगरसेविका राजश्री ताई जठाळे या मान्यवरांनी भेट दिली त्यांचें स्वागत सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्याला विशेष सहकार्य सौ अनिताताई अडकीने, सो जयश्रीताई भेंडकर, सौ मनिषाताई मडावी, माधुरीताई पालिवाल, सौ वैशाली मांडळे, कु तेजस्विनी लोणकर यांनी केले, स्वागतोत्सुक अनमोल चव्हाण, सचिन चव्हाण, कोषाध्यक्ष प्रशांत कंकाळे, सचिव सौ ज्योती चौधरी उपाध्यक्ष अंबाई संस्था उपस्थित होते.
वितरण सोहळ्याला ग्राफीक्स डीझाईनची जबाबदारी सनी राजेंद्र गोसावी, फोटो नियोजन जबाबदारी यश कडु यांनी, साउंड संतोष वानखडे यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रध्दाताई कोल्हटकर यांनी केले.
तुळजापूर येथील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच गणेश नवाडे सर यांनी सौ माधुरी सचिन चव्हाण यांना आई भवानीची प्रतिमा भेट देऊन देऊन सत्कार केला राष्ट्रमाता जिजाऊ मातृसन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती च्या संस्थापक अध्यक्षा सौ माधुरी सचिन चव्हाण यांनी केले होते.


0 Comments