निलेगावात चोरीच्या संशयावरून मारहाण; एकाचा मृत्यू, १६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल-Murder Crime News Naldurg

Hot Posts

6/recent/ticker-posts

निलेगावात चोरीच्या संशयावरून मारहाण; एकाचा मृत्यू, १६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल-Murder Crime News Naldurg

निलेगावात चोरीच्या संशयावरून मारहाण; एकाचा मृत्यू, १६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल-Murder Crime News Naldurg

तुळजापूर प्रतिनिधी : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे चोरीच्या संशयावरून दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात १६ जणांविरुद्ध खुनासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास निलेगाव येथील मारुती मंदिरासमोर ही घटना घडली. मयत बबन चंदर काळे (रा. पारधी वस्ती, तुळजापूर खुर्द) व जखमी सागर जयराम भोसले हे दोघे गावात आले असता, आरोपी पिंकी शैलेश शिंदे, विकी शैलेश शिंदे व राहुल शैलेश शिंदे यांनी त्यांना पकडून ठेवले.

यानंतर त्यांनी गावातील इतरांना बोलावून हे दोघे चोरी करण्यासाठी आले असल्याचा आरोप केला. या संशयावरून संतप्त जमावाने बबन काळे व सागर भोसले यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बबन काळे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकरणी फिर्यादी राहुल बबन काळे (वय २१) यांनी ११ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
मोहसीन वजोद्दीन इनामदार, पापा वजोद्दीन इनामदार, शंकर उर्फ श्रीधर जमादार, विठ्ठल महादेव घंटे, प्रकाश दशरथ जमादार, धनेश्वर प्रकाश जमादार, आदित्य प्रकाश जमादार, सचिन मारुती जमादार, पवन हनमंत जमादार, दादा बसवराज जमादार, नितीन मारुती जमादार, समर्थ रमेश जमादार, रमेश अर्जुन जमादार, पिंकी शैलेश शिंदे, विकी शैलेश शिंदे, राहुल शैलेश शिंदे (सर्व रा. निलेगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव).

पोलीसांनी या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(२), ११८(१), ११५(२), १८९, १९०, १९१ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(२)(व्ही) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सध्या पोलीस पुढील तपास करत असून आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments