होनाळा येथे तीन गायींचा खुराकीतील विषबाधेमुळे मृत्यू; तुळजापूर तालुक्यात खळबळ — गुन्हा नोंद -Tuljapur News

Hot Posts

6/recent/ticker-posts

होनाळा येथे तीन गायींचा खुराकीतील विषबाधेमुळे मृत्यू; तुळजापूर तालुक्यात खळबळ — गुन्हा नोंद -Tuljapur News

होनाळा येथे तीन गायींचा खुराकीतील विषबाधेमुळे मृत्यू; तुळजापूर तालुक्यात खळबळ — गुन्हा नोंद -Tuljapur News


📍 होनाळा (ता. तुळजापूर) | प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील होनाळ गावात आज सकाळी घडलेली धक्कादायक घटना शेतकरी वर्गाच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरली आहे. शेतकरी विजय गिरीजाप्पा शेलार यांच्या गोठ्यात अवघ्या १५ मिनिटांच्या कालावधीत तीन जर्सी गाईंचा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,फिर्यादी नामे- विजय उमराव शेलार, वय 41 वर्षे, रा. होनाळा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे बारुळ शिवारातील शेत गट नं 16/2 मध्ये अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे नुकसान व प्राण्यांना ठार मारण्याचे उद्देशाने शेडमधील नेचर डिलाईट कंपनीचे मका भरडा व सुगरास पोत्यामधील खाद्यामध्ये कोणते तरी विषारी औषध मिसळले असुन ते खाद्य दुध देणाऱ्या सात गाईना खाण्यास दिले असता सदर सात गाईना विषबाधा होवून त्यामधील तिन गाई मयत झाल्या. उर्वरीत गाई या पशु वैद्यकीय अधिकारी यांचे करवी उपचार घेत आहेत. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विजय शेलार यांनी दि.30.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 325 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.दरम्यान, गोठ्यातील इतर गाईंमध्येही अस्वस्थता दिसून येत असून दोन गाईंची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंब अधिकच चिंतेत सापडले आहे.

घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी धीरज पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्राथमिक पाहणी करून पशुखाद्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.


Post a Comment

0 Comments