तुळजापूरात मंदिराजवळून दुचाकी चोरी; 40 हजारांची HF डिलक्स लंपास-Tuljapur Crime News
तुळजापूर (प्रतिनिधी): तुळजापूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. बारलिंग मंदिर परिसरातून एका नागरिकाची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी त्रिंबक दादाराव डोलारे (वय 38, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांची अंदाजे 40,000 रुपये किंमतीची एचएफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल (क्र. एमएच 25 एक्यु 3848) ही दि. 29 एप्रिल 2026 रोजी पहाटे 2.15 ते 3.00 वाजण्याच्या दरम्यान बारलिंग मंदिराजवळून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबर (FIR) वरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत तसेच लॉकिंगची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0 Comments