डॉ.राजाराम शेंडगे यांची भाजपा वैद्यकीय आघाडी मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड.

Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ.राजाराम शेंडगे यांची भाजपा वैद्यकीय आघाडी मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड.

डॉ.राजाराम शेंडगे यांची भाजपा वैद्यकीय आघाडी मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड.


------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- उमरगा येथील शेंडगे रिसर्च सेंटरचे डॉ.राजाराम शेंडगे यांची भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे.डॉ.राजाराम शेंडगे यांच्या सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांचे नेतृत्वात माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांचे मार्गदर्शनात व भाजपा वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या संमतीने पत्राद्वारे डॉ . राजाराम शेंडगे यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.दिलेल्या नियुक्ती पत्रात नमुद केले की,अनेक वर्ष आरोग्य वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात अविरत कार्य करीत आहात या सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनता रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशी असलेला आपला सलोखा व सेवावृत्ती भाव लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचे पक्ष संघटन वाढविण्यासाठी व पक्षाचे ध्येयधोरणे सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल तसेच पक्षाने दिलेले काम निश्चित कराल असा विश्वास ठेवत डॉ.राजाराम शेंडगे यांची भाजपा वैद्यकीय आघाडी मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्राद्वारे कळविले आहे. डॉ . राजाराम शेंडगे यांची भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने धाराशिव जिल्ह्यातून कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments