मौजे काक्रंबा-होनाळा मार्गावर गतिरोधकाची मागणी; अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा.
-------------------------------------------
शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर यांनी दिले सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन.
-----------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे):- काक्रंबा-होनाळा दरम्यान नुकताच तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरत असून संभाव्य अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः या मार्गावर जिल्हा परिषद शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) तात्काळ गतिरोधक उभारण्याची मागणी केली आहे. याबाबत उपअभियंत्यांना लेखी निवेदन देऊन रस्त्यावरील अतिवेग नियंत्रित करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नव्याने तयार झालेल्या रस्त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहने मोठ्या वेगाने धावत आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सद्दाम मुलाणी उपस्थित होते.दरम्यान, “गतिरोधकाचे काम तातडीने करण्यात आले नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा चेतन बंडगर यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीवर कितपत तत्परतेने कार्यवाही करतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

0 Comments