मौजे काक्रंबा गावाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा. मुस्कान शेख यांची पोलीस दलात निवड-Police Selection Kankraba News
__________________________
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे काक्रंबा गावची कन्या, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन करणारी मुस्कान रऊफ शेख गावाच्या इतिहासात प्रथमच महिला पोलीस बनून तिने काक्रंब्याचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे अनेक मुलींना प्रेरणा मिळेल, हा विश्वास आहे.
हिची नवी मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल काक्रंबा शिवसैनिकांच्या वतीने मुस्कान रऊफ शेख हिचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला व तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दिलीप बंडगर दयानंद वाघमारे शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर शाम सुरवसे दिपक भिसे कार्तिक वाघमारे बालाजी गोडसे साईनाथ झाडे वासुदेव भालेराव पप्पू झाडे नामदेव झाडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

0 Comments