गंधोरा शिवारातून १३ हजारांची इलेक्ट्रिक मोटार चोरी; नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल-Tuljapur Live update News
धाराशिव : नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील गंधोरा शिवारामध्ये शेतातील इलेक्ट्रिक मोटार चोरीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रविण पदमाकर पाटील (वय ४०, रा. गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांच्या मालकीच्या गंधोरा शिवारातील गट क्रमांक ३११ मधील शेतात बसविण्यात आलेली ५ एचपी क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. चोरीस गेलेल्या मोटारीची किंमत सुमारे १३ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना दि. २५ मे २०२६ रोजी घडली असून, शेतात लावलेली मोटार अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रविण पाटील यांनी शोधाशोध केली. मात्र मोटार मिळून न आल्याने त्यांनी दि. २७ मे रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
फिर्यादीच्या प्रथम खबरिवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. परिसरातील शेतांमध्ये सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांनी पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

0 Comments