तुळजापूर : सौरऊर्जा प्रकल्पाला चोरट्यांचा फटका; 3 लाख रुपयांची 800 मीटर ॲल्युमिनियम तार लंपास सराटी केशेगाव परिसरातील घटना-Naldurg Police Station Crime News
तुळजापूर प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील सराटी व केशेगाव परिसरातील सौरऊर्जा प्रकल्पातून तब्बल 3 लाख रुपयांची ॲल्युमिनियम तार चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 31 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून ते दि. 1 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली. सराटी येथील शेत गट क्रमांक 57 तसेच केशेगाव येथील शेत गट क्रमांक 232 मध्ये उभारण्यात आलेल्या बी.एन.सी. पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड, पुणे या सौरऊर्जा प्रकल्पातील सुमारे 800 मीटर ॲल्युमिनियम तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
चोरीस गेलेल्या तारांची किंमत सुमारे 3 लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी विजय लाला गायकवाड, सुपरवायझर, बी.एन.सी. पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड, पुणे, सध्या रा. सलगर वस्ती, डोणगाव रोड, सोलापूर यांनी दि. 10 जून 2026 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील सौरऊर्जा प्रकल्प आणि विद्युत साहित्यावर वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रकल्प व्यवस्थापनामध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.या नळदुर्ग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

0 Comments