युवती नेतृत्वाला नवी दिशा; यशवंत संघर्ष सेना विद्यार्थी आघाडीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी कु. श्वेताताई शिनगारे यांची निवड
महाराष्ट्रातील विद्यार्थी व युवती नेतृत्व क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरत, यशवंत संघर्ष सेना विद्यार्थी आघाडीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी कु. श्वेताताई गणेश शिनगारे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कु. श्वेताताई शिनगारे यांनी आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रात सातत्याने सक्रिय भूमिका बजावत युवती व विद्यार्थिनींमध्ये नेतृत्व निर्माण करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या संघटन कौशल्य, कार्यतत्परता आणि समाजहिताच्या दृष्टीकोनामुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि युवतींना अधिक सक्षम व्यासपीठ मिळेल तसेच शिक्षण, सामाजिक जाणीव, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावी काम उभे राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यावेळी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, श्वेताताई यांच्या कार्यातून संघटनेचे विचार राज्यभर अधिक व्यापक स्तरावर पोहोचतील आणि समाजकारणासोबत राष्ट्रकारणातही सकारात्मक योगदान मिळेल.
यशवंत संघर्ष सेना विद्यार्थी आघाडी, महाराष्ट्र राज्यच्या वतीने कु. श्वेताताई गणेश शिनगारे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
“जय यशवंत..! जय संघर्ष..!”

0 Comments