मोठी दुर्घटना : सिद्धनाथ दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला काळाचा घाला; विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, 7 जण बचावले-Pandharpur Accident News Live

Hot Posts

6/recent/ticker-posts

मोठी दुर्घटना : सिद्धनाथ दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला काळाचा घाला; विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, 7 जण बचावले-Pandharpur Accident News Live

मोठी दुर्घटना : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला काळाचा घाला; पिकअप  विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, 6 जण बचावले- सोलापूर जिल्ह्यातील घटना Pandharpur Accident News Live 

सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात रविवारी अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळील विहिरीत कोसळल्याने 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर स्थानिकांच्या तत्परतेमुळे 7 जणांना जीवदान मिळाले आहे.

या अपघाताबाबत प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन थेट रस्त्यालगतच्या विहिरीत जाऊन पडले. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी एकच आक्रोश उसळला.या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने काही जणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, वाहनातील अनेक प्रवासी विहिरीत अडकले होते. त्यानंतर पोलिस, अग्निशामक दल आणि प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचाव व शोधमोहीम सुरू केली.

प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला क्रेनच्या सहाय्याने पिकअप वाहन बाहेर काढण्यात येणार असून त्यानंतर विहिरीत उतरून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या ठिकाणी यापूर्वी अशा प्रकारचा अपघात झाल्याची नोंद नसून हा पहिलाच मोठा अपघात आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघातात पूर्वी देवदर्शन झाल्यानंतर काढलेला फोटो

या अपघातातील मृतांचा नेमका आकडा, ओळख आणि अपघाताचे कारण याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

मृतांची नावे

इंदुबाई दशरथ बावचे, महिला , ६० वय

पुजा अमोल सातोरे, महिला, २३

पुजा बालाजी बावचे, महिला , २७

अश्विनी संदीप बावचे, महिला , २७

अश्विनी संदिप बावचे, महिला , १४

संस्कार संदिप बावचे, पुरुष , १४

संस्कृती संदिप बावचे, महिला, १४

आरव अमोल सातोरे, पुरुष , ८

समर्थ बालाजी बावचे, पुरुष, ६ महिने

शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आर्थिक मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, ' सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खासगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.

'अपघातातून 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आलंय. त्यांच्यावर उपचार केले जाताहेत. जिल्हाधिकारी-पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झालेत. ते स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहोत. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल', असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Post a Comment

0 Comments