नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत; इटकळ शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात-Itkal School start News

Hot Posts

6/recent/ticker-posts

नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत; इटकळ शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात-Itkal School start News

 नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत; इटकळ शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात-Itkal School start News 


"""""'''''"""""""""'""""'"'""""""""""'''''''''''' 

इटकळ (दिनेश सलगरे) : मौजे इटकळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते जंगी स्वागत करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली. शाळेच्या आवारात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. प्रविण माशाळकर, पंचायत समिती सदस्या मा. प्रियंका मिटकरी, पोलिस पाटील मा. विनोद सलगरे, माजी सरपंच राहुल बागडे, कबीर मिटकरी, गुणवत्ता कक्षाचे प्रमुख श्रीकृष्ण मुळे, माजी अध्यक्ष अनिल भोपळे, व्यवस्थापन समितीचे सदस्य दयानंद गायकवाड, दादा भोपळे तसेच विशेष शिक्षिका अर्चना पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्रीकृष्ण मुळे यांच्या हस्ते सुमारे ३०० विद्यार्थ्यांना मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात भर पडली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा. सतिश ढोणे यांनी केले. सूत्रसंचालन सतिश साखरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन एकनाथ नैताम सर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात शाळेतील सुनिता माने, सविता पवार, कविता पुदाले, सारिका इंगळे, जया भोसले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एकूणच, नवागत विद्यार्थ्यांचे आत्मीयतेने स्वागत करून शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात शाळेने पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments