मौजे इटकळ येथे ‘जलतारा’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी घेतले पुनर्भरण खड्डे.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे इटकळ येथे ‘जलतारा’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी घेतले पुनर्भरण खड्डे.

मौजे इटकळ येथे ‘जलतारा’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी घेतले पुनर्भरण खड्डे.



"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे) :- महसूल विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ‘जलतारा’ या महत्त्वाकांक्षी योजनेला तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ परिसरात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सुमारे दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी विहीर व बोअरवेल पुनर्भरणासाठी आपल्या शेतात खड्डे खोदून घेतले आहेत. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजलपातळी वाढविण्यास मदत होणार आहे. गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती व प्रसिद्धी करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी या योजनेत सक्रिय सहभाग नोंदविला.तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे व गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली. ११ जून ते १३ जून या कालावधीत दोन जेसीबी मशिनच्या साहाय्याने सलग पाच दिवस इच्छुक शेतकऱ्यांच्या शेतात विहीर व बोअरवेलजवळ पुनर्भरण खड्डे घेण्यात आले.अवघ्या तीन दिवसांत सुमारे १५० खड्डे पूर्ण करण्यात आले असून, या उपक्रमाला विशेषतः शेवटच्या दोन दिवसांत मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जलतारा योजना गावात यशस्वीपणे रुजत असल्याचे दिसून येत आहे.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम महसूल अधिकारी जी. के. तोडकरी, लक्ष्मण पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नितीन कांबळे, मंडळ अधिकारी डी. पी. गायकवाड, सरपंच क्षिरसागर, पोलीस पाटील विनोद सलगरे यांच्यासह श्रीकृष्ण मुळे, राहुल बागडे, दयानंद गायकवाड, केशव गायकवाड, शिवानंद हांडगे, हसन पठाण, महेश जळकोटे, सिद्धनाथ माशाळकर व विठ्ठल जळकोटे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहित केले.महसूल विभागाच्या या पुढाकारामुळे इटकळ येथे जलतारा योजना यशस्वी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments