चिंचपूर खुर्द खून प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नाटकातून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई-Murder Crime News Live Update

Hot Posts

6/recent/ticker-posts

चिंचपूर खुर्द खून प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नाटकातून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई-Murder Crime News Live Update

चिंचपूर खुर्द खून प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नाटकातून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई-Murder Crime News Live Update 


धाराशिव | प्रतिनिधी

परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणात फरार असलेल्या मुख्य आरोपीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून शिताफीने पकडून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे खून प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाची गती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 10 जून 2026 रोजी आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/26 अन्वये भा.न्या.सं. (BNS) कलम 103(1), 3(5) अंतर्गत चिंचपूर खुर्द येथील खून प्रकरण नोंद करण्यात आले होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीपक विक्रम गरड (रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा, जि. धाराशिव) हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता.

दरम्यान, आरोपी हा कर्नाटक राज्यातील बसवकल्याण परिसरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार यांनी विशेष पथक रवाना केले.

पथकाने बसवकल्याण येथे जाऊन संशयिताचा शोध सुरू केला. शोधमोहीमेदरम्यान आरोपीने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने पाठलाग करून अतिशय शिताफीने त्याला पकडले आणि ताब्यात घेतले.

त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आंबी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार, सपोनि श्री सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच चापोअ रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

या कारवाईमुळे फरार आरोपींविरुद्ध धाराशिव पोलिसांची कार्यक्षम आणि जलद कारवाई पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Post a Comment

0 Comments