खडकवस्ती येथे दाम्पत्यावर लोखंडी रॉड-काठ्यांनी हल्ला; ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल-Tuljapur Live News Update
तुळजापूर, प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील खडकवस्ती येथे जुन्या वादातून एका दाम्पत्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद झुंबर काळे (वय 60, रा. खडकवस्ती ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 04 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास खडकवस्ती येथे आरोपींनी एकत्र येऊन गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यानंतर फिर्यादी व त्यांची पत्नी चित्रा काळे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, मारहाणीदरम्यान लोखंडी रॉड, काठी तसेच सिमेंटच्या गटूचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले असून या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी अतिश शरद काळे, पंडीत मेनकुदळे, शिवलिंगवा मेनकुदळे, शहाजी शिंदे, शालन शिंदे आणि सुरज शिंदे (रा. खडकवस्ती, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्याविरोधात दि. 10 जून 2026 रोजी दाखल करण्यात आलेल्या प्रथम खबरीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणात भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 189(2), 191(2), 191(3), 190 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(आर), 3(1)(एस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
घटनेमुळे खडकवस्ती परिसरात चर्चा सुरू असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

0 Comments