मौजे इटकळ ग्रामपंचायतचे बिगुल वाजले, प्रभाग (वार्ड)आरक्षण सोडत मोठ्या उत्साहात संपन्न-Itkal Grampanchyat News Live

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे इटकळ ग्रामपंचायतचे बिगुल वाजले, प्रभाग (वार्ड)आरक्षण सोडत मोठ्या उत्साहात संपन्न-Itkal Grampanchyat News Live

मौजे इटकळ ग्रामपंचायतचे बिगुल वाजले, प्रभाग (वार्ड)आरक्षण सोडत मोठ्या उत्साहात संपन्न-Itkal Grampanchyat News Live 

-----------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ येथील ग्रामपंचायतची प्रभाग सदस्य आरक्षण सोडत शुक्रवार दि.१२ जून २०२६ रोजी हनुमान मंदीरावर ग्रामसभा घेऊन तीन प्रभागातील ९ सदस्य रोटेशन पद्धतीने जाहीर करण्यात आले. त्यामध्ये 

प्रभाग क्रमांक एक मध्ये एस.सी.पुरुष-१,ओबीसी स्त्री-१,

सर्वसाधारण स्त्री-१

प्रभाग क्रमांक दोन मध्ये ओबीसी पुरुष-१ ,एस.सी. स्त्री -१, सर्वसाधारण स्त्री-१ 

प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण पुरुष -२ सर्वसाधारण स्त्री -१ असे एकूण तीन प्रभागातील नऊ सदस्य आरक्षण रोटेशन पद्धतीने काढण्यात आले. सरपंच पदाचे आरक्षण यापूर्वीच सर्वसाधारण महीला काढण्यात आलेले आहे. यावेळेस प्रथमच सरपंच पदासाठी संपूर्ण गावातून मतदान होणार असुन सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या आरक्षण सोडत कार्यक्रमास मंडल अधिकारी डी. पी. गायकवाड, ग्रामसेवक नितीन कांबळे, तलाठी गोरोबा तोडकरी, पोलीस पाटील विनोद सलगरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments