/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> मौजे हिप्परगा ताड जिल्हा परिषद शाळेची आणखी एक यशस्वी झेप; इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी सोनम लक्ष्मण मोरे पात्र-Hipparga Tad ZP School

Hot Posts

मौजे हिप्परगा ताड जिल्हा परिषद शाळेची आणखी एक यशस्वी झेप; इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी सोनम लक्ष्मण मोरे पात्र-Hipparga Tad ZP School

मौजे हिप्परगा ताड जिल्हा परिषद शाळेची आणखी एक यशस्वी झेप; इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी सोनम लक्ष्मण मोरे पात्र-Hipparga Tad ZP School


 



━━━━━━━━━━━━━━━━

सलग दुसऱ्या वर्षी शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश; गुणवत्तेचा वाढता आलेख कायम

-----------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे) : तुळजापूर तालुक्यातील मौजे हिप्परगा ताड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. शाळेतील कुमारी सोनम लक्ष्मण मोरे हिने इयत्ता सातवी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वीरीत्या पात्र ठरत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या उल्लेखनीय यशामागे शाळेचे मुख्याध्यापक तथा वर्गशिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन, विद्यार्थिनीची जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रम असल्याचे सांगण्यात आले. सोनमच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विशेष म्हणजे, मागील सलग दोन वर्षांपासून हिप्परगा ताड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी एनएमएमएस व शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरत आहेत. त्यामुळे शाळेचा गुणवत्तेचा आलेख सातत्याने उंचावत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आदर्श केंद्र ठरत आहे.विद्यार्थ्यांच्या या सातत्यपूर्ण यशामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments