/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> मौजे इटकळ ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन घंटागाडीचे जल्लोषात स्वागत; गावाच्या स्वच्छतेला नवी गती-Live News

Hot Posts

मौजे इटकळ ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन घंटागाडीचे जल्लोषात स्वागत; गावाच्या स्वच्छतेला नवी गती-Live News

मौजे इटकळ ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन घंटागाडीचे जल्लोषात स्वागत; गावाच्या स्वच्छतेला नवी गती-Live News 


════════════════

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन निधीतून घंटागाडी उपलब्ध; ओला-सुका कचरा संकलन अधिक प्रभावी होणार

══════════════


इटकळ (दिनेश सलगरे):- मौजे इटकळ ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या स्वच्छता अभियानाला अधिक बळ देणाऱ्या नवीन घंटागाडीचे मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करून उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन निधीतून ही घंटागाडी उपलब्ध करण्यात आली असून, यामुळे गावातील ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करून त्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होणार आहे.

'स्वच्छ गाव – सुंदर गाव' या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ देणारी ही घंटागाडी गावातील स्वच्छता राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. घराघरातून नियमित कचरा संकलन होणार असल्याने रस्त्यांवरील अस्वच्छता कमी होऊन नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासही मदत होणार आहे.नवीन घंटागाडीच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्या सौ. प्रियांका मिटकरी, सरपंच क्षीरसागर, उपसरपंच फिरोज मुजावर, सदस्य अमोल पाटील, श्रीकृष्ण मुळे, दादा भोपळे, रफिक मुजावर, हुसेन मकानदार, आस्तिक बागडे, कबीर मिटकरी, ग्रामपंचायत अधिकारी नितीन कांबळे तसेच गावातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांना ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच देण्याचे आवाहन केले. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी इटकळ घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ग्रामपंचायतीच्या स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments