/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> जालना–नांदेड समृद्धी महामार्गासाठी उभ्या पिकांवर जेसीबी; पोलिसांच्या ताफ्यासमोर ढसाढसा रडला बळीराजा, प्रशासन व सरकाविरोधात संतापाचा उद्रेक-Jalna-Nanded Samrdhi National Highway Road

Hot Posts

जालना–नांदेड समृद्धी महामार्गासाठी उभ्या पिकांवर जेसीबी; पोलिसांच्या ताफ्यासमोर ढसाढसा रडला बळीराजा, प्रशासन व सरकाविरोधात संतापाचा उद्रेक-Jalna-Nanded Samrdhi National Highway Road

जालना–नांदेड समृद्धी महामार्गासाठी उभ्या पिकांवर जेसीबी; पोलिसांच्या ताफ्यासमोर ढसाढसा रडला बळीराजा, प्रशासन व सरकाविरोधात संतापाचा उद्रेक-Jalna-Nanded Samrdhi National Highway Road 

परभणी | प्रतिनिधी : जालना–नांदेड समृद्धी महामार्गासाठी सेलू तालुक्यातील वालूर, गुळखंड, आडगाव, चिकलठाणा तसेच जिंतूर तालुक्यातील मारवाडी परिसरात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्तात सुरू केली. या कारवाईदरम्यान अनेक शेतकऱ्यांनी जिवापाड जपलेल्या उभ्या पिकांवर जेसीबी चालवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, यामुळे परिसरात प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

समृद्धी महामार्गासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला सुरुवातीपासूनच स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा, बागायती जमिनींचे चुकीचे मूल्यांकन करून त्या जिरायती म्हणून दाखवण्यात आल्याचा तसेच शेतातील विहिरी, झाडे, पाईपलाईन आणि इतर मालमत्तेची योग्य नोंद न घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तब्बल ६७ दिवस साखळी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. अनेक शेतकऱ्यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून, जमीन अधिग्रहणासंदर्भातील वाद न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला.

उभ्या पिकांवर जेसीबी; वर्षभराच्या कष्टांवर पाणी

दिवस-रात्र कष्ट करून वाढवलेले हळदीसह इतर उभे पीक काही क्षणांत जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त करत, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारची कारवाई करणे अमानुष असल्याची प्रतिक्रिया संतप्त शेतकऱ्यांनी दिली.

'जिवंतपणी झाडांचा अंत पाहिला'; शेतकऱ्यांचा आक्रोश

दुपारी सुमारे एक वाजल्यानंतर प्रशासनाचा ताफा जिंतूर तालुक्यातील मारवाडी परिसरात पोहोचला. यावेळी शेतकरी रामकिसन भाबट, गणेश देशमुख आणि दीपक देशमुख यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाडांचे योग्य मूल्यांकन करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

तहसीलदार शीतल कच्छवे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल विभुते आणि अन्य अधिकाऱ्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने आंब्याची फळधारणा झालेली झाडे, इतर वृक्ष आणि हळदीचे उभे पीक हटवण्यात आले. अनेक वर्षे जपलेली झाडे स्वतःच्या डोळ्यांसमोर उन्मळून पडताना पाहून शेतकरी रामकिसन भाबट यांना अश्रू अनावर झाले. ते शेतातच बसून ढसाढसा रडू लागल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले.

पंचनाम्याची प्रत देण्याचे प्रशासनाचे आश्वासन

कारवाईदरम्यान वाद वाढल्यानंतर उपविभागीय अधिकारी दीपककुमार वाघमारे, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर

Post a Comment

0 Comments