/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> जि.प. केंद्रीय शाळा इटकळ येथे २६२ विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप

Hot Posts

जि.प. केंद्रीय शाळा इटकळ येथे २६२ विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप

जि.प. केंद्रीय शाळा इटकळ येथे २६२ विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप.


----------------------------------------

IKS Health कंपनी व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबईचा स्तुत्य उपक्रम; १०० टक्के विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ.

------------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):-  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इटकळ येथे IKS Health कंपनीच्या CSR फंडातून व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण २६२ विद्यार्थ्यांना स्कूल किट व रिफिल किटचे वाटप करण्यात आले. नूतन शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक सतीश ढोणे यांनी सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्याशी सातत्याने संपर्क साधून शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळवून दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने पालक व विद्यार्थ्यांनी IKS Health कंपनी तसेच सेवा सहयोग फाउंडेशनचे आभार मानले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पोलिस पाटील विनोद सलगरे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून पंचायत समिती सदस्या सौ. प्रियंका कबीर मिटकरी उपस्थित होत्या.यावेळी नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शकील मुजावर, उपाध्यक्षा सौ. स्वाती खटके, तसेच सदस्य श्रीकृष्ण मुळे, दयानंद गायकवाड, इरफान मकानदार, अब्दुल मकानदार, सौ. प्रिती भोपळे, सौ. भाग्यश्री बागडे व सौ. कौशल्या रसाळ यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सतीश ढोणे यांनी केले. श्री. एकनाथ नैताम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश साखरे, नागेश राजगुरू, सौ. सुनीता माने, सौ. सविता पवार, सौ. कविता पुदाले, सौ. सारिका इंगळे, सौ. जया भोसले व सौ. करुणा क्षीरसागर या शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून त्यांच्या शिक्षणाला बळ देणारा IKS Health कंपनी व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांचा हा उपक्रम समाजातील उद्योग व स्वयंसेवी संस्थांनी शिक्षण क्षेत्रासाठी पुढाकार घेण्याचा आदर्श निर्माण करणारा ठरला.

Post a Comment

0 Comments