चिवरी ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
सरपंच शिवकन्या प्रशांत बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण; माजी सैनिकांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात सरपंच शिवकन्या प्रशांत बिराजदार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. यावेळी संपूर्ण ग्रामपंचायत परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
या कार्यक्रमास उपसरपंच लक्ष्मण लबडे, ग्रामसेवक नरहरी कांबळे, गावातील माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, तरुण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





0 Comments