/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात; २९ विद्यार्थ्यांनी केले भाषण

Hot Posts

चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात; २९ विद्यार्थ्यांनी केले भाषण

चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात; २९ विद्यार्थ्यांनी केले भाषण

चिवरी /प्रतिनिधी बिभीषण मिटकरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल बिराजदार, उपाध्यक्ष अंजली शरद निकाळजे, ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील, शिक्षणतज्ज्ञ बबन शिंदे तसेच समिती सदस्य सुभाष चिमणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सुभाष चिमणे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकला वही व रंगखडूचे वाटप केले. तसेच विशालसिंह बायस, पूजा काळजाते, वनमाला काळजाते, सपना बिराजदार आणि विनोद पाटील यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला उपसरपंच लक्ष्मण लबडे, ग्रामसेवक नरहरी कांबळे, माजी सैनिक संभाजी काळजाते, ग्रामपंचायत कर्मचारी शंकर झिंगरे, अनिल देडे सर आदी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्जे सर यांनी सूत्रसंचालन केले, तर सोनटक्के सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पाटील मॅडम, कलशेट्टी मॅडम तसेच कर्मचारी आशा बायस व सुनील बायस यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहकार्य केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील तब्बल २९ विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.

देशभक्ती, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, मान्यवरांची उपस्थिती आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे चिवरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला.






Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>