/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> मौजे इटकळ येथील मराई चौक गणेश महोत्सवाच्या अध्यक्षपदी रामराजे पाटील; उपाध्यक्षपदी पांडुरंग माशाळकर.

Hot Posts

मौजे इटकळ येथील मराई चौक गणेश महोत्सवाच्या अध्यक्षपदी रामराजे पाटील; उपाध्यक्षपदी पांडुरंग माशाळकर.

मौजे इटकळ येथील मराई चौक गणेश महोत्सवाच्या अध्यक्षपदी रामराजे पाटील; उपाध्यक्षपदी पांडुरंग माशाळकर.


------------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील मराई चौकात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री गणेश जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी युवा नेते रामराजे पाटील, तर उपाध्यक्षपदी पांडुरंग माशाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.रामराजे पाटील हे सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग घेत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट आयोजन करण्यासाठी त्यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा गणेश महोत्सव उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.निवडीनंतर नूतन अध्यक्ष रामराजे पाटील व उपाध्यक्ष पांडुरंग माशाळकर यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी गणेश मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी गणेश महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>