/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> नळदुर्गच्या "आपले घर" बालगृहातून १४ वर्षीय मुलगा बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशयKidnap Naldurg Police Station Crime

Hot Posts

नळदुर्गच्या "आपले घर" बालगृहातून १४ वर्षीय मुलगा बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशयKidnap Naldurg Police Station Crime

 

नळदुर्गच्या "आपले घर" बालगृहातून १४ वर्षीय मुलगा बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय-Kidnap Naldurg Police Station Crime

 

धाराशिव  : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ‘आपले घर’ बालगृहातून १४ वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज हरी काळे (वय १४, रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर; सध्या ‘आपले घर’ बालगृह, नळदुर्ग) हा बालगृहात राहत होता. दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास तो बालगृहातून बेपत्ता झाला. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बालगृहाचे बाल अधीक्षक संदीप राजेंद्र चवले (वय ३०, रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी दि. १८ ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

अल्पवयीन मुलगा बालगृहातून बेपत्ता झाल्याने या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुलाला नेमके कोणी आणि कोणत्या कारणासाठी पळवून नेले, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>