/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> विहिरीत पडलेल्या साळींदराची सुखरूप सुटका; रेस्क्यू टीमचे कौतुकास्पद कार्य-Tuljapur News

Hot Posts

विहिरीत पडलेल्या साळींदराची सुखरूप सुटका; रेस्क्यू टीमचे कौतुकास्पद कार्य-Tuljapur News

विहिरीत पडलेल्या साळींदराची सुखरूप सुटका; रेस्क्यू टीमचे कौतुकास्पद कार्य-Tuljapur News 


---------------------------------------

इटकळ (दिनेश सलगरे) :- तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथील भिमाशंकर जमादार यांच्या शेतालगत असलेल्या कोरड्या विहिरीत साळींदर पडल्याची घटना शुक्रवारी घडली. रविवारी गावाकडे आल्यानंतर पार्थ जमादार यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तत्काळ सोलापूर येथील Animal Rescue Organisation शी संपर्क साधून साळींदराच्या बचावासाठी मदत मागितली.पार्थ जमादार यांनी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण राजगुरू, उपाध्यक्ष तुषार तुपसमिंदर तसेच राहुल परदेशी यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी धाराशिव जिल्हा वनविभागाची आवश्यक परवानगी घेऊन सोलापूरहून निलेगाव येथे धाव घेतली.रेस्क्यू टीमने अत्यंत दक्षतेने विहिरीत उतरून साळींदराला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले. वेळेत मिळालेली माहिती आणि रेस्क्यू टीमने दाखविलेल्या तत्परतेमुळे साळींदराचे प्राण वाचले.या बचावकार्यात जि. प. प्रा. शाळा सराटीचे मुख्याध्यापक भिमाशंकर जमादार, विठ्ठल जमादार, पार्थ जमादार तसेच वनविभाग धाराशिवचे कर्मचारी पिरप्पा मुळे व शिवाजी पवार उपस्थित होते.वन्यजीव संकटात सापडल्यास नागरिकांनी स्वतःहून त्यांना पकडण्याचा किंवा इजा होईल असे प्रयत्न करण्याऐवजी तातडीने वनविभाग अथवा अधिकृत वन्यजीव बचाव पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>