/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> गोठ्यात बांधलेल्या तीन म्हशींची चोरी; गंधोरा शिवारात अडीच लाखांचा डल्ला-Nalurg Police Station

Hot Posts

गोठ्यात बांधलेल्या तीन म्हशींची चोरी; गंधोरा शिवारात अडीच लाखांचा डल्ला-Nalurg Police Station

गोठ्यात बांधलेल्या तीन म्हशींची चोरी; गंधोरा शिवारात अडीच लाखांचा डल्ला-Nalurg Police Station 


नळदुर्ग  : तुळजापूर तालुक्यातील गंधोरा शिवारातील गोठ्यात बांधलेल्या तीन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत शेतकऱ्याचे तब्बल २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंधोरा (ता. तुळजापूर) येथील सचिन बाबुराव शिंदे (वय ३६) यांचा गंधोरा शिवारात गोठा आहे. दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपासून दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गोठ्यातून तीन म्हशी चोरून नेल्या.

चोरीस गेलेल्या तीनही म्हशींची एकूण किंमत अंदाजे २ लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सकाळी गोठ्यात म्हशी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर चोरी झाल्याचे समोर आले.

यानंतर सचिन शिंदे यांनी दि. १८ ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, रात्रीच्या वेळी गोठ्यातून तीन म्हशी एकाचवेळी चोरीला गेल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून, चोरीस गेलेल्या म्हशींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>